Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीनंतर काय सागितले, हे पहा (maratha Reservation: See what the Maratha reservation issue said after Sharad Pawar's visit,)
Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीनंतर काय सागितले, हे पहा
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. "मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यामुळे या प्रश्नी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांना सांगितलं," असं संभाजीराजे म्हणाले.
मुंबई - छञपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण विषय आज 27 मे रोजी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.
या नंतर काय सांगितले , तसंच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करुन संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार अशी माहितीही संभाजीराजे यांनी दिली.
खासदार छञपती संभाजीराजे
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "गेले तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
0 टिप्पण्या