मोठी बातमी..❗ राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा (Big news..❗ People in the state will get free vaccinations; Thackeray government's big announcement )

 🗞️ *मोठी बातमी..❗ राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा*




🗞️ *News मराठा I Update*


👉 18 वर्षांवरील सगळ्यांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यासाठी 'कोविन' आणि आरोग्य सेतू अँपवर 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. 


🙄 त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोठी माहिती दिली आहे.


🗣️ *काय म्हणाले नवाब मलिक?*


▪️ केंद्र सरकारने 1 मेपासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे वय वर्ष 45 खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.


▪️ कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला 400 रुपये आणि खाजगी रुग्णालयांना 600 रुपयाला मिळणार आहे.


▪️ कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना 600 रुपये व खाजगी विक्रीसाठी 1200 रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.


▪️ महाराष्ट्र सरकारच्या वतीने लवकरच राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल.


▪️ तर यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिला होता. 


📌 दरम्यान, यासाठी लवकरच जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून, राज्य सरकारकडून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu