*सकाळच्या - न्युज हेडलाइंस घडामोडी, 26 एप्रिल 2021*
🗞️ *News मराठा | Bulletin*
▪️ कोरोनाचे संकट आपल्या संयमाची परीक्षा, कोरोना लढाईत केंद्र सरकार पूर्ण शक्तिनिशी खंबीरपणे राज्य सरकारच्या पाठीशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही
▪️ भारतात कोरोनाचा झपाट्याने होत असलेल्या फैलावामुळे जग चिंताक्रांत; कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातून मदतीचे हात; अमेरिका, युरोप, चीन, पाकिस्तान आदींकडून विचारणा
▪️ उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलं; सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा
💉 *_महाराष्ट्रात 6,98,354 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 35,30,060 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 64,760 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ राज्य सरकार मोफत लसीकरण करण्यास अनुकूल तर 1 मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती
▪️ चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली
▪️ कोवॅक्सिन लसीचेही नवे दर जाहीर, कोवॅक्सिन राज्य सरकारांना 600 रुपये प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपये प्रतिडोस इतक्या किंमतीला मिळणार
▪️ कोरोनामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार, चित्रपटरसिकांना हा सोहळा ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन पाहता येणार
▪️ डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली; केन विल्यम्सनचे अर्धशतक व्यर्थ
Copyright (c) 2020 marathanews All Right Reseved
0 टिप्पण्या