संभाजी राजे यांची आज मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर काय भूमिका असणार? (What will be the role of Sambhaji Raje on the issue of Maratha reservation today?)

 

       🚩 Maratha Reservation 🚩

संभाजी राजे यांची आज  मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर काय भूमिका असणार?


खासदार संभाजी राजे छत्रपती


  संभाजीराजे छत्रपती आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडतील. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आणि नेत्यांच्या बैठकीनंतर संभाजीराजे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 हे पण वाचा - कोणता निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसांत जाहीर करणार आहेत.

मुंबई: खासदार संभाजी राजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज (28 मे) आपली भूमिका मांडतील. संभाजी राजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद आज संध्याकाळी मुंबईत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आणि नेत्यांच्या बैठकीनंतर संभाजी राजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा - महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती 

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची बैठक

तत्पूर्वी खासदार संभाजी राजे दुपारी  विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काय करता येईल या विषयावर ही बैठक होणार आहे. याशिवाय संभाजी राजे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतील असे समजते, 


27 मे च्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटल्यावर काय झाले. 



राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि खासदार संभाजीराजे भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "गेले तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं. 

हे पण वाचा- कोविड -19  लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर पोस्ट करू नये , सरकारने कोणता इशारा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu