त्रिपाठी इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ( KKR ) संघाकडून खेळत आहे. तो महाराष्ट्राकडून खेळतो.
वाढत्या कोविड -19 प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लादलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक कोंढवा परिसराची पाहणी करीत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास त्रिपाठी कोंढवातील खादी मशीन चौकात कार चालवित होता. “क्रिकेटपटू त्रिपाठीने फेस मास्क घातलेला नव्हता आणि लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान तो विनाकारण गाडी चालवत होता. कारमध्ये आणखी काही जण होते, ”कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की त्रिपाठी यांना 500 रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी दंड भरला आणि त्याला पावतीही देण्यात आली.
0 टिप्पण्या