Mi 11 Ultra स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा फीचर्स आणि किंमत असेल कोणत्या कलर मध्ये असणार आहे? (mi 11 Ultra smartphone will be launched in India, see features and price will be in what color?)

 Mi 11 Ultra स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा फीचर्स आणि किंमत असेल कोणत्या कलर मध्ये असणार आहे?

(Mi 11 Ultra smartphone will be launched in India, see features and price will be in what color?)


Mi ने आज आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi 11 Ultra ला India मध्ये लाँच केले आहे. हा स्मार्टफोन सर्वात मोठ्या कॅमेरा सेन्सर्स सोबत येतो. फोनमध्ये सेकंडरी डिस्प्ले सुद्धा दिले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचे लेटेस्ट फ्लॅगशीप स्नॅपड्रॅगन 888 SoC दिले आहे. हे दुसऱ्या अँड्रॉयड फ्लॅगशीप स्मार्टफोन सारखे जसे सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा, वनप्लस ९ प्रो आणि विवो X60 प्रो+ या फोनला टक्कर देणार आहे. स्मार्टफोनला गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे.

आणि आता भारतात पण हा विकला जात आहे.

या इव्हेंट मध्ये  Mi 11X सीरीजला लाँच करण्यात आले होते. ज्यात दोन स्मार्टफोन्सचा समावेश होता. यात Mi 11X आणि Mi 11X प्रोचा समावेश आहे. दोन्ही फोनची किंमत MI 11 अल्ट्रा पेक्षा जास्त आहे.

Mobile ची किमत ६९ हजार ९९९ रुपये असेल .

कंपनीने India मध्ये शाओमीचा सर्वात मोठा टीव्ही सुद्धा लाँच केला आहे. 

Mi QLED टीव्ही 75 4K 120Hz पॅनेल सोबत येतो.


फीचर्स काय ,किमत काय असेल .

India यात फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. 

१२ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचे स्टोरेज मिळते. कंपनीने या फोनला देशात सिंगल व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. शाओमीचा हा फोन महाग आहे, कारण, कंपनीने या फोनला चीनहून आयात केले आहे. चीनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६७ हजार रुपये आहे. 

तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७२ हजार ५०० रुपये आहे. 

१२ जीबी रॅम ५१२ जीबी इंटरन स्टोरेजच्या फोनची किंमत ७८ हजार १०० रुपये आहे.

फोनच्या मागे १.१ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. कॅमेरा सिस्टम मध्ये प्रायमरी ५० मेगापिक्सलचा सॅमसंगचा GN2 सेंसर दिला आहे. 

जो OIS, सेकेंड्री ४८ मेगापिक्सल सोनी IMX586 पेरीस्कोप टेलीफोटो लेन्स OIS सोबत येतो. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा सोनी अल्ट्रा वाइड युनिट दिला आहे. तर फ्रंट मध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu