▪️ पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द; कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आज तीन महत्त्वाच्या बैठका, राज्यांचे मुख्यमंत्री, ऑक्सिजन निर्मात्यांशी बातचित
▪️ 53 सैनिकांसह इंडोनेशियाची पाणबुडी गायब, समुद्रात युद्ध सराव करत असताना ही पाणबुडी गायब; जीव वाचवण्यात निष्णात भारतीय नौदलाची DSRV रवाना
▪️ महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार काहीही करायला तयार आहे. केंद्र सरकारच्या पायाही पडायला तयार पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!; आरोग्यमंत्री टोपे
💉 *_महाराष्ट्रात 6,99,858 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 33,30,747 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 62,479 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ पालघर जिल्ह्यातील वसईच्या कोविड सेंटरमध्ये आग, आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू, अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर मिळवले नियंत्रण
▪️ वाढत्या कोरोनामुळे पंढरपुरात चैत्र यात्रा रद्द, तर मंदिरं 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार ;उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याचा प्रशासनाचा निर्णय
▪️ पेन्शन स्किम: पाच निवृत्ती वेतन योजनांतील 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रतिमहिना एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार- मंत्री धनंजय मुंडे
▪️ बॉलिवूडमधील 'सुपरहिट' नदीम श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
▪️ IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच, राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने मारला विजयी चौकार
0 टिप्पण्या