▪️ बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान पार, बंगालमध्ये ममता दिदी, आसाम-पुद्दुचेरीत भाजप, तामिळनाडूत डीएमके-काँग्रेस तर केरळमध्ये लेफ्टची सत्ता येण्याचा एक्झीट पोलचा अंदाज
▪️ कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठीच्या सुधारित; मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी
▪️ पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचे; राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
*💉 _महाराष्ट्रात काल 66,159 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 68 हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त, 771 जणांचा मृत्यू_*
▪️ कोवीशिल्ड नंतर भारत बायोटेक राज्यांना प्रति डोस 400 रुपये दराने देणार लस, कंपनीने 200 रुपयांनी लसीचा दर केला कमी
▪️ सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी; तर पवारांना जिवे मारण्याची धमकी
▪️ कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात, 'मिशन ऑक्सिजन इंडियाला' 1 कोटीची मदत
▪️ IPL 2021 : पृथ्वी शॉच्या शानदार अर्धशतकासह एकाच षटकात ठोकले सहा चौकार, दिल्लीचा कोलकातावर 7 गडी राखून दणदणीत विजय
0 टिप्पण्या