▪️ निवडणूक निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर निवडणूक आयोगाची बंदी, पाच राज्यांतील मतमोजणीपूर्वी आयोगाच्या सूचना
▪️ 4 लाख 42 हजार रुग्ण कोरोनामुक्त , राज्यातील सहा दिवसातील चित्र ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
▪️ रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरला बेकायदा आणल्याप्रकरणी ते अडचणीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल
▪️ माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके वक्तव्य
▪️लसीकरणाच्या मोहिमेला आणखी वेग येणार; रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप 1 मे रोजी देशात दाखल होणार
▪️ मोफत लसीकरणाबाबत उद्या कॅबिनेट बैठकीत चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, मोफत लसीवरुन सुरू असलेल्या मतभेदांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण
राज्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच कोकण, विदर्भ, मराठवाड्यात येत्या 4 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
▪️ IPL 2021 : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन तुल्यबळ संघांमध्ये लढत
0 टिप्पण्या