वाचा ,आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले? 1 मे रोजी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार नाही,काय असेल कारण?
केंद्र सरकारने येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले होते. मात्र ही योजना फसण्याची शक्यता वाटत आहे.
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण लसच मिळत नसेल तर लसीकरण कसे करणार? असा सवाल राजेश टोपे यांनी केला आहे. टोपे यांच्या या सवालामुळे मोफत लसीकरणावर प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
.
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही हतबलता व्यक्त केली. मोफत लसीकरणाबाबतचा अहवाल आरोग्य विभागाने कॅबिनेटला दिला आहे. उद्या कॅबिनेटची बैठक होईल. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्यामुळे लसीकरणाबाबतचा निर्णय आधीच जाहीर करणं योग्य नाही, अस राजेशं टोपे म्हणाले.
0 टिप्पण्या