देशात कोरोना मृत्यूंचा आकडा पहा, किती आहे ? ( Look at the number of corona deaths in the country, how much is it?)

 देशात कोरोना मृत्यूंचा आकडा पहा, किती आहे ? 


देशात कोरोना मृत्यूंचा आकडा तीन लाखांवर गेला आहे. दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेतही केंद्राने कुंभ मेळा, निवडणुका जाहीर केल्या. राज्यांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय म्हणून पाहावा, असे जाहीर केले. मोठ्या प्रमाणात लशी निर्यात करण्यात आल्या. परिणामी देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेला. 

आधिक माहीती करा - ईथ क्लिक करा.

५ एप्रिल २०२१ रोजी देशातील एकूण मृत्यू होते १ लाख ६५ हजार १०१. त्यानंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे १ मे रोजी देशातील एकूण मृत्यूंची संख्या होती २ लाख ११ हजार. आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचलाय. याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत.

हे पण वाचा - 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लस लागू करण्याच्या बदलांवर स्लॉटची बुकिंग न करता लसीकरण करण्यात येईल

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरही सिस्टीमचा कल आपण कोरोना काळात कसे चांगले काम केले आहे, हे दाखवण्याकडे आहे. पण गंगाकिनारी दफन केलेले हजारो मृतदेह सिस्टीमच्या अपयशाची साक्ष देतात. केवळ अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याने या अपयशाची जबाबदारी झटकता येणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu