आजच्या निवडनुक मधिल जनतेने दिलेला निकाल ( The result given by the people in today's election)

आजच्या निवडनुक मधिल जनतेने दिलेला निकाल 





 *ब्रेकिंग ! पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात महाविकासआघाडीला जनतेने नाकारलं,भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय*


राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. 17 एप्रिलला या पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडले होते.राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. दरम्यान,17 एप्रिलला या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली होती.


दरम्यान, आत्तापर्यंत पंढरपूर मंगळवेढा या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या 36 फेऱ्या झाल्या आहेत. यात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी मोठी उसंडी मारत जवळपास विजय निश्चित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu