राज्य सरकारकडून 'मिशन ऑक्सिजन' मोहिमेला सुरुवात!!! (State Government launches 'Mission Oxygen' campaign !!! )

  राज्य सरकारकडून 'मिशन ऑक्सिजन' मोहिमेला सुरुवात!!!

State Government launches 'Mission Oxygen' campaign !!! 


   राज्यात कोरोना महामारीने उग्र अवतार धारण केला आहे. यामुळे राज्यात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडण्यास सुरूवात झाली. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.


  आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असताना राज्य सरकारने या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे.


 याचाच एक भाग म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करण्याची मोहीम सुरू केली आहे. पाहूयात काय आहे ही 'महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन' मोहीम.


          हि मोहीम म्हणजे नेमके काय?

       

हे पण वाचा-

 कोविड -19 : देशाला पूर्ण लॉकडाउन आवश्यक आहे का? सरकारने काय सांगितले ते जाणून घ्या...


▪️ ऑक्सिजनचा निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी "महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन" ही मोहीम सुरू कण्यात आली आहे. 


▪️ सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होते. तर सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन राज्य बाहेरून घेते.


▪️ सद्यस्थितीत असलेल्या 38 PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टनची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त PSA प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे.


▪️ याच्यामाध्यमातून जवळपास 240 मेट्रिक टनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होणार आहेत.


 *दरम्यान, रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन क्षमता देण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार अन्य योजनांचाही विचार करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu