आज दिवसभरातील ठळक घडामोडी
News maratha | Bulletin*
*-----------------------------------*
▪️ कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महत्त्वाची बैठक; पंतप्रधान मोदी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
▪️ देशात काल 2 लाख 34 हजार 692 नवीन कोरोना रुग्ण, तर 1 लाख 23 हजार 354 रुग्णांना डिस्चार्ज, 1341 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
▪️ रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता अनिवार्य, मास्कचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड ; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा
▪️ अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे मागणी
▪️ अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने 14 दिवसांचा जनता कर्फ्यु पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला जाहिर
▪️ कोरोनाच्या काळात अनेकांच्या मदतीसाठी निस्वार्थपणे धावून आलेला अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण; इंस्टाग्रामद्वारे दिली माहिती
▪️ तमिळनाडू चित्रपटसृष्टी मध्ये आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते विवेक यांचे निधन
▪️ IPL 2021 : SRH विरुद्ध MI , चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार सामना
🎯 *_हि माहिती नक्की शेअर करा..!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 टिप्पण्या