▪️ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे राजकारणी व सेलिब्रिटींना कशी मिळतात?हायकोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं
▪️ 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड चे माजी प्रमुख जे. के. दत्त यांचं कोरोनाने निधन
▪️ इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 213 पॅलेस्टिनी नागरिक ठार; या आक्रमणात गाझा येथील एकमेव असलेली कोरोना चाचणीची प्रयोगशाळाही उद्ध्वस्त
▪️ तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी 305’ या तराफ्यावरील 26 जणांना जलसमाधी; या तराफ्यावरील 186 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका
▪️ राज्यातील रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून सुरु; यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही
*💉 _राज्यात काल 34,031 नवीन कोरोना रुग्ण; तर 51,457 रुग्ण कोरोनामुक्त, 594 रुग्णांच्या मृत्यू_*
▪️ सावधान..! महाराष्ट्रासाठी पुढचे दहा दिवस महत्त्वाचे, म्युकरमायकोसिसचे राज्यात थैमान; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गंभीर इशारा
▪️ व्हॉट्सअॅपने नवीन गोपनीयता धोरण मागे घ्यावे; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे निर्देश
▪️ भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा; अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि वेगवान युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या दोन दिग्गजांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली!!
0 टिप्पण्या