सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 11 मे 2021. (Morning - Brief Events, 11 May 2021)

 सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 11 मे 2021 

Morning - Brief Events, 11 May 2021

🗞️ *News मराठा | Bulletin*


▪️ अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा; या महिन्याच्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या मदतीचा आकडा वाढण्याची शक्यता



▪️ प्रशासनाला स्वातंत्र्य देणारा आणि विश्वास ठेवणारा उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मुंबईला लाभला हे मी माझे भाग्य समजतो; पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची कृतज्ञता


▪️ बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह;  या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थान‍िक प्रशासनाने चौकशीचे आदेश


*💉 _महाराष्ट्रात 5,90,818 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 44,69,425 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 76,398 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या 15 दिवसांच्या राज्यव्यापी कर्फ्यूला गोव्यात सुरुवात; हा कर्फ्यू 24 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार 


▪️ पुणेकरांनो विनाकारण बाहेर पडणार असाल तर सावधान, दुपारी 12 वाजल्यापासून पुण्यातील लाॅकडाऊनचे नियम अधिक कडक; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता


▪️ मिरज महापालिकेचा गलथान कारभार, चाचणी न करताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, घरावर लावला कोविड प्रतिबंधक क्षेत्रचा फलक, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.


▪️ राजस्थान आणि मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात पेट्रोल पुन्हा शंभरीपार, पेट्रोल-डिझेलच्या दरांनी गाठला नवा उच्चांक; मुंबईत पेट्रोल वाढून 97.86 रुपये लिटर तर डिझेल 89.17 रुपये लिटर


▪️ विराट नेहमी गोलंदाजांना पाठिंबा आणि मनाप्रमाणे गोलंदाजीचे स्वातंत्र्य, विराटच्या नेतृत्वात खेळताना कोणतेही दडपण नसते; मोहम्मद शमीने उधळली स्तुतिसुमने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu