▪️ मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय
▪️ कोरोनाची तिसरी लाट भारतात येऊ शकते, रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनच हवा : एम्स' संचालक रणदीप गुलेरिया
▪️ आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोहफुलांवरील निर्बंध उठवले; मोहफुलासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही
*💉 _महाराष्ट्रात 6,41,910 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 41,07,092 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 71,742 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ मेक्सिकोत मेट्रोचा पूल कोसळून 23 जणांचा मृत्यू; मेक्सिको सिटी हे जगातील सर्वात गजबजलेले व वर्दळीचे शहर आहे
▪️ राज्यात मुंबई, ठाणेसह 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना विषाणू रुग्णसंख्येत घट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
▪️ महाराष्ट्राला आणखी 200 मेट्रिक टन ऑक्सिजन द्या! अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली
▪️ राज्यातील सर्वात मोठय़ा 'गोकुळ'मध्ये सत्तांतर, मतमोजणीत एकूण 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवत विरोधी गटाने घडवला बदल सत्ताधारी गटाला केवळ 4 जागांवर विजय
0 टिप्पण्या