▪️ अकरावी CET प्रवेश परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचा अंतिम निर्णय लवकरच; शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द
▪️ केंद्र सरकारने जर घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले
▪️ कोरोनाचा कहर ! बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ, आता मध्य प्रदेशातील नदीतही मृतदेह; यामुळे नदीकाठच्या स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
*💉 _महाराष्ट्रात 5,46,129 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 46,00,196 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 78,007 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ काँग्रेससह12 विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; अनावश्यक खर्च टाळून सर्व निधी कोरोना व्हायरस महामारी निवारासाठी खर्च करण्याची मागणी
▪️ भारतात होणार आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन!; अलीकडेच अमेरिकेत या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी.
▪️ हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रांना इस्रायलचं चोख प्रत्युत्तर; 1000 बॉम्ब हवेतच परतवून लावले; इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण
▪️ तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती; 15 जूनला पुढील सुनावणी होणार
▪️ सिंगापूर ओपन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द ; सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांतच्या आशा संपुष्टात
0 टिप्पण्या