किती प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे , हे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे काय सागितल आहे.
राज्य सरकार जेवढ्या प्रमाणात लसींचा पुरवठा मागत आहे, तेवढ्या प्रमाणात केंद्र सरकारने लस पुरविल्यास राज्यात दररोज आठ लाख नागरिकांचे लसीकरण करु शकतो, अशी भूमिका राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी मांडली आहे.
राज्यात १३ हजार संस्था आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अशा संस्था येतात. या प्रत्येक केंद्रावर दिवसाला १०० लसी दिल्या तरी राज्यात रोज १३ लाखांचे लसीकरण होऊ शकते. ही महाराष्ट्राची शक्ती असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
0 टिप्पण्या