सकाळच्या -न्युज हेडलाइंस घडामोडी,, 25 एप्रिल 2021*
Morning News Headlines 25 April2021
🗞️ *News मराठा | Bulletin*
▪️ उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाचा पुन्हा हाहा:कार, हिमकडा कोसळून 8 जणांचा मृत्यू, तर 430 लोकांना बाहेर काढण्यात सैन्याला यश
▪️ पीआर व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी आरोग्य सेवांवर लक्ष द्या, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
▪️ केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश; मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडेसिव्हिरचा पुरवठा वाढला; ठाकरेंकडून पंतप्रधानांचे आभार
▪️ केवळ 99 दिवसांत कोरोना लसीचे 14 कोटी डोस देणारा भारत सर्वात वेगवान देश ठरला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
💉 *_महाराष्ट्रात 6,94,480 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 34,68,610 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 63,928 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ महाराष्ट्राच्या मदतीला धावले आंध्रप्रदेश, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची मोठी घोषणा.
▪️ नागपूर आणि विदर्भात ऑक्सिजनच्या साठवणुकीसाठी सिलेंडरची कमतरता, नितीन गडकरींनी गुजरातमधून मागविले खाली सिलेंडर
▪️ दारूची तलफ झाल्याने घेतलं सॅनिटायझर, पाच जणांचा मृत्यू, तर आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक; मृतांचा आकडा वाढण्याची भीती; यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात घडली ही घटना
▪️ राज्यात आजपासून चार दिवस पावसाची शक्यता; तर तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरींची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज
IPL 2021 : कर्णधार संजू सॅमसनची नाबाद संयमी खेळी, राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय; तर पुन्हा मॉर्गनच्या नशिबी अपयश विचित्र पद्धतीने झाला रन आउट
0 टिप्पण्या