राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोणा कोणाची उपस्थिती होती

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोणा कोणाची उपस्थिती होती . 

यावेळी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील (Jayant Patil), उपमुख्यमंत्री ना. अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, खा.प्रफुल्ल पटेल (praful patel), अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक (nawab malik), खा.सुनील तटकरे (Sunil Tatkare), खा. सुप्रिया सुले (supriya sule)यांसह इतर मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित होते.


(Rajesh tope) राजेश टोपे यानी काय सागितले ,


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्य मंत्री ना. (rajesh tope) यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कोरोना काळातील आव्हाने आणि त्याच्याशी लढा देताना झालेले काम याबाबत उपस्थितांना माहिती दिली.




कोरोना काळात आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांपासून प्रेरणा घेऊन सर्वांनीच चांगले योगदान दिले. कोरोनाची पहिली लाट आली असताना आम्ही काळजीपोटी पवार साहेबांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरिही पवार साहेबांनी काही काळानंतर बाहेर पडून जनतेसाठी राज्यभर दौरा केला.

हे पण वाचा - 👇

नवी मुंबई: पावसामुळे एनएमएमसी केंद्रांवर आज कोविड -19 ची लसीकरण नाही.



साहेबांच्या या दौऱ्यामुळे सर्वांनाच प्रेरणा, ऊर्जा मिळाली. ठिकठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासला तेव्हा ती पुरवण्याचे कामही पवार साहेबांनी केले होते. साहेबांच्या या दौऱ्यांमुळे, कार्यामुळे अनेकांना धैर्य आले .

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९६% पर्यंत आला असून परिस्थिती नियंत्रणात येतेय. तरीही वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना आवाहन करतो की, आपण कोविड प्रोटोकॉल पाळलाच पाहीजे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळणे यापुढेही आवश्यक आहे .



खासगी रुग्णालयांच्या शुल्क आकारणीबाबत कॅपिंगचे नियम राज्य सरकारने घालून दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले आहेत. या आदेशांचे पालन होत आहे की नाही? याकडे लक्ष ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावे .

यापुढे लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्य हे दररोज १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास सक्षम आहे. लसीकरण सुलभ पद्धतीने होण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापले योगदान द्यावे. जनतेमध्ये जागृती निर्माण करावी .

उपमुख्यमंत्री ना. (Ajit Pawar) यांनी निधी दिल्यामुळे आरोग्य विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रुग्णालयांच्या अर्धवट बांधकामांना पूर्ण करण्यासाठी चार हजार कोटींची तरतूद केली आहे. पक्षाच्या मंत्र्यांची ही कामे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सांगावीत.



उपमुख्यमंत्री ना. अजित पवार (Ajit Pawar) 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ना. (Ajit Pawar) अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.




आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटांवर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही देतो .

मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका NCP ची आहे 

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे .

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना काळात लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. आपल्याला आणखी काही दिवस अशीच मदत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे .


प्रदेशाध्यक्ष ना. (Jayant Patil) जयंत पाटील 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सकारात्मक आहे. आपल्या पक्षाची भूमिका पददलितांच्या हक्कांसाठी लढण्याचीही आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची पवार साहेबांची शिकवण पक्ष नेहमीच पाळत आला आहे .

महाराष्ट्रापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा गंभीर विषय आहे. हा प्रश्न संसदेत नेऊन घटनेत बदल करण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीला जाऊन मा. पंतप्रधानांना आपण आवाहन केले .

तसेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी देशात सर्व प्रथम आदरणीय पवार साहेबांनी मंडल आयोगाची स्थापना केली होती. यातून ओबीसी समाजाला संरक्षण दिले गेले. आत या समाजाचे राजकीय आरक्षण संकटात आले आहे .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu