संध्याकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 7 जून 2021 (Evening - Brief Events, 7 June 2021)

संध्याकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 7 जून 2021

 Evening - Brief Events, 7 June 2021

  🗞️ *News Maratha | Bulletin*



1) मराठा आरक्षणासाठी भाजपची महत्त्वाची बैठक, आंदोलनावर चर्चा होत आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल यानंतर मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून मराठा आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी भाजपचे बडे नेते उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

2) आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा, कामाबद्दल केलं कौतूक

'आशा' सेविका लढवय्या आणि वीरांगणा असून करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं सांगतानाच करोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली.

3) covid19 situation : करोनावर मंत्रिगटाची बैठक; आरोग्यमंत्री म्हणाले, '१० राज्यांत ८३ टक्के रुग्ण'

देशातील करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज मंत्रिगटाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी देशातील स्थितीची माहिती दिली आहे.

4) इंधन दरवाढी विरोधात अनोखं आंदोलन; बाजारपेठेत घोडेस्वारी, लोक बघतच बसले.

घरगुती गॅस व पेट्रोलसह अन्य इंधनांच्या दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर काँग्रेसच्या वतीनं आज अनोखं आंदोलन करण्यात आलं.

5) पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

देशातील करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये काही निर्बंधांसह व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधा मोदी आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत.


6) सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास बसणार दंड; मुंबईच्या महापौरांचा इशारा

राज्य सरकारच्या नियमानुसार मुंबईचा समावेश तिसऱ्या गटात झाला आहे. त्याप्रमाणे मुंबईसाठी अटी लागू झाल्या आहेत. (mumbai unlock lockdown)

7) करोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना आता औषधाची गरज नाही, सरकारचा दावा.

देशात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. आता लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या रुग्णांना औषधांची गरज नाही. उत्तम आहार आणि सकारात्मक विचार आणि मैत्री ठेवल्यास ते बरे होतील, असं नाव्या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

8) भेटीगाठींचा सिलसिला सुरूच! आता बाळासाहेब थोरात पोहोचले शरद पवारांच्या घरी

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. (Balasaheb Thorat Met Sharad Pawar)

9)पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन ट्रेनची धडक, ३० ठार व ५० हून अधिक जखमी

सिंध प्रांतात भीषण रेल्वे अपघात झाला असून ३० जण ठार झाले आहेत. विचित्र अपघातात दोन ट्रेनची धडक झाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

10) Gold Price सोने-चांदीमध्ये घसरण ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये नफावसुलीचा सपाटा सुरुच आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूच्या किमतीत घसरण झाली होती. आज सोने आणि चांदीने आठवड्याची सुरुवात नकारात्मक केली आहे.कमॉडिटी बाजार सुरु होताच सोने ५० रुपयांनी तर चांदीमध्ये २०० रुपयांची घसरण झाली आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu