सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 9 मे 2021 (Morning - Brief Events, 9 May 2021)

सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 9 मे 2021

Morning - Brief Events, 9 May 2021

🗞️ *News मराठा | Bulletin*


▪️ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ॲक्शन प्लॅन, राज्यातील फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय 



▪️ ओळखपत्र, RT-PCR रिपोर्ट नसला, तरी कोविड संशयित रुग्णांना दाखल करुन घ्यावं लागणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय धोरणात मोठे बदल


▪️ देशात कोरोनाची चिंता वाढली असताना रुग्णांना झटपट बरे करणारे '2-डीजी' हे रामबाण औषध लवकरच उपलब्ध होणार; या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी


 *💉 _राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन बाधित रुग्ण, तर 82 हजार 266 रूग्ण कोरोनामुक्त , 864 रूग्णांचा मृत्यू_*


▪️ कोरोना विरोधातील लढाईत अदानी ग्रुपचाही पुढाकार; 48 क्रायोजेनिक टँकची केली खरेदी; हे टँक 780 टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यास सक्षम


▪️ भारतीय अमेरिकन डॉक्टरांकडून 5 हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची मदत; भारतातील अपुरी वैद्यकीय यंत्रणा पाहता घेतला मोठा निर्णय


▪️ राज्यात पुढील चार दिवस सिंधुदुर्ग आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज 


▪️ इंग्लंड दौऱ्यात कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी; भारतीय क्रिकेटपटूंसाठी तब्बल 18 दिवसांचा क्वारंटाईन पिरेड; मात्र बायो- बबलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu