Maharashtra Lockdown महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता किती दिवस असनार लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय
 |
Maharashtra Lockdown likely to extend till 15th May Cabinet Ministry Decision |
महाराष्ट्र : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. 1 मेपर्यंत असलेला लॉकडाऊन आणखी 2 आठवड्याने वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी त्यासंदर्भात संकेत दिले होते. (Maharashtra Lockdown likely to extend till 15th May Cabinet Ministry Decision)
Corona Vaccine Registration :तर कशी कराल नोंदणी?
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
0 टिप्पण्या