सकाळच्या - न्यूज़ हेडलाइंस, 21 एप्रिल 2021* ( Morning News Headlines, April 21, 2021)

 



*सकाळच्या - न्यूज़ हेडलाइंस, 21 एप्रिल 2021*

🗞️ *News मराठा  | Bulletin*


श्री राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे धाम आहे,

एक वचनी, एक वाणी,मर्यादा पुरूषोत्तम,अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…

*श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩*


▪️ लॉकाडऊन हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरावा, असे देशातील राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचना


▪️ अमेरिकी नागरिकांना भारतात येण्यास मज्जाव; भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट चालू असून नागरिकांनी त्या देशात जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले


▪️ अयोध्यामध्ये रामनवमी: कोरोनामुळे यंदा अयोध्येत जल्लोष नाही, सीमाबंदी असेल; निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच 5-5 तुकड्या करून मिळणार श्री राम मंदिरात प्रवेश


▪️ अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली; FDA आयुक्तपदी आता परिमल सिंह 


▪️ ही वेळ सर्वांसाठी गंभीर, ही राजकारणाची वेळ नाही; रेमडेसिवीरवरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर शरद पवार यांची भूमिका स्पष्ट 


💉 *_महाराष्ट्रात 6,83,856 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 32,13,464 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 61,343 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह जाहीर, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती


▪️ अमित ठाकरेंना कोरोनाची लागण; लिलावती रुग्णालयात दाखल; दोन दिवसांपासून ताप आणि खोकला असल्याने  चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह


▪️IPL 2021 : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला दिले होते 138 धावांचे आव्हान; दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून मिळवला विजय


 _*फक्त एका क्लिक मध्ये रहा अपडेट*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu